मन माझे…!

दोन दिवसांच्या दगदगिनंतार ठरवलंच होतं की एक दिवस फक्त आराम करायचा..झोपायचं..आणी तसं झालं ही..घरातल्या कामांना लागणार्या वेळेपेक्षा जास्त वेळ झोपण्यात घालवला..दिवसा झोपण्यात..

दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे रूटीन हे होतंच त्यामूळे रात्रीची झोप ही हवीच! पण दिवसा झालेल्या झोपेमुळे रात्रिच्या झोपेचे बारा वाजले अन घड्याळाचेही..!

डोळे मिटून पडून राहण्याचा माझा भाबडा प्रयत्नही करुन झाला पण झोप काही येईना..तसं पहिलं तर मोबाइल नामक डबड़ होत शेजारी पण त्या प्रकाशने नवर्याची झोपमोड करण्यापेक्षा शांत पहुड्ण केव्हाही बरं!

मी शांत डोळे मिटुन पडून राहिले,लागेल तेव्हा लागेल झोप.पण कशाच काय? उद्या कोणती भाजी करायची इथुन ते माजी मजल घरातल्या प्रोब्लेम्स पर्यंत जाऊं ठेपली.त्यात व्हट्स अप वर आलेले मेसेजेस ते दिवसभरातील घडामोडी,पुढिल काही दिवस करावयाच्या घरातील कामांची यादी,इंस्टाग्राम-यू ट्यूब वर पाहिलेले गाण्याचे वीडियोज़ ते etc etc

या विचारांच्या गर्दीत एक गोष्ट लक्षात आली की मन कुठल्या ही एका गोष्टीवर ठाम राहत नाहीये,ते फिरतय..जसे पक्षी एका फांदीवरून दुसर्या फांदीवर जातात अगदी तसे.

“या काही दिवसात मी मज़्यशी बोललेच नहिये.” मी एकदम सुन्न झाले.मला दिवसभरात इतका निवांत वेळ मिळतो जिथे मी फक्त एकटी असते.स्वत:शी बोलू शकते.पण मी घाबरते,स्वत:शी संवाद करायला.आपल्याला बर्याच गोष्टी माहित असतात,आपण उगाच आपल्या मनाची समजुत काढत असतो,एखादी गोष्ट उगाच समोरच्याला ठासुन सांगत असतो.पण ते म्हणतात ना की नक्की मला सांगतोयस की स्वतःलाच पटवून देतोयस !

मी क्षणार्धात जगी झाले.टक्क जागी!त्या वेळी एक लक्षात आलं की मी नाही पळू शकतं या गोष्टींपासुन,यांचा सामना मलाच करव लागणारे…मला स्वत:शी बोलावं लागणार..माझ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेच आहेत.असं होईल की लगेच सगळे प्रश्न सुटतील असं नाही.काही प्रश्नांची अचुक उत्तरं मिळतील तर काही प्रश्न अनुत्तरित राहतील. या विचारांच्या गर्दीतून बाहेर आल्यावर(थोडसं बाहेर आल्यावर) एक ओळ आठवली… “तोरा मन दर्पण केहलाये.. भले बुरे सारे कर्मोंको देखे और दिखाए….!”

Leave a comment